
| मुंबई | तुम्ही जर पॅन कार्ड अजूनही आधारशी लिंक केलं नसेल, तर तातडीने करा. कारण आधार-पॅन लिंक करण्याची मुदत 31 मार्चला संपणार आहे. मात्र शेवटच्या दिवशी गोष्टी करण्याचं ठेवण्यापेक्षा आजच तुम्ही आधार-पॅन कार्ड लिंक करून घ्या.
आधार कार्डला पॅन कार्ड कसं लिंक करणार?
1. सगळ्यात आधी तुम्हाला Income tax e-Filing पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.
2. या पोर्टलवर तुम्हाला आयडी, पासवर्ड आणि जन्म तारीख टाकावी लागेल.
3. या साईटवर लॉग ईन केल्यावर एक नवी विंडो उघडेल, ज्यावर आधार-पॅन लिंक करण्याबाबत लिंक दिसेल.
4. जर तुम्हाला अशी लिंक दिसली नाही, तर तुम्ही प्रोफाईल सेटिंगवर जाऊन लिंक आधार हा पर्याय निवडू शकता.
5. यामध्ये तुम्हाला नाव, जन्मतारीख, लिंग ही माहिती भरायची आहे.
6. तुमच्या आधार कार्डवर असलेल्या माहितीप्रमाणेच तुम्ही या पोर्टलवर तुमची माहिती भरा.
7. ही माहिती जुळली, की तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. आणि खाली असलेली Link now हा पर्यायावर क्लिक करायचं आहे.
8. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक झाल्याचा मेसेज येईल.
याआधी आधार-पॅन लिंक करण्याची डेडलाईन जुलै 2020 होती, मात्र ती वाढवून आता 31 मार्च 2021 करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही आधार-पॅनला लिंक केलं नसेल, तर आताच करून घ्या.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री