प्रकाश आंबेडकर मातोश्रीवर , विविध मुद्यांवर चर्चा..!

| मुंबई | वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सलग एक तास चर्चा झाली. या दोघांमध्ये तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली, असल्याची सूत्रांची माहिती आहे. याशिवाय राजकीय विषयांवर देखील बैठकीत चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.

प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील तीन महत्त्वाचे मुद्दे :

१. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’वर अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. याबाबत तपासाबाबत चर्चा झाली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांकडून तपासाबाबत सुरु आहे. याबद्दल रोज उद्धव ठाकरेंशी फोनवर बोलणं होत आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

२. त्यानंतर कोळी, भोई या समाजाच्या मागण्यांबद्दल चर्चा झाली. बोगस सोसायटी बनवून मच्छीमारांना दिले जाणारे कॉन्ट्रॅक्ट चुकीचं आहे. हा मुद्दा प्रकाश आंबेडकरांनी बैठकीत उपस्थित केला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी यावर काहीतरी ठोसं पावलं उचलू असे सांगितले आहे.

३. गेल्या काही महिन्यात राज्यात अनुसूचित जातींवर अन्याय अत्याचार होत आहे. त्यावरही प्रकाश आंबेडकर-मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. तसेच अनेक राजकीय विषयही या बैठकीत उपस्थित केले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *