पंतप्रधान मोदी स्वतः ची प्रतिमा वाचविण्यासाठी खोटे बोलत आहेत – राहूल गांधी

| नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा आक्रमक वक्तव्य केले आहे. त्यांनी पुन्हा एकदा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल, असे म्हणत राहुल गांधींनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.

https://twitter.com/RahulGandhi/status/1284457425983037442?s=19

चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा मिळवलाय आणि भारत सरकार ‘चेम्बरलेन’सारखे वागत आहे. यामुळे चीन आणखी पुढे जाईल. भारताला मात्र मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत मोजावी लागेल, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. तसेच या ट्विटसोबत राहुल यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. हा व्हिडिओ राजनाथ सिंह यांच्या लेह दौ-याचा आहे. भारत चीन दरम्यान चर्चेतून तोडगा काढणे कितपत शक्य आहे हे सांगता येणे कठीण आहे, असे राजनाथ सिंह यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

तसेच आज त्यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओ मधून पंतप्रधान मोदी संपूर्ण देशासोबत खोटे बोलत आहेत, असा घणाघाती आरोप केला असून ते त्यांची प्रतिमा वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हंटले आहे..

https://twitter.com/RahulGandhi/status/1285069516502732800?s=19

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *