
| मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनबाबत सतत बोलत आहेत. त्यामुळे ते चीनमध्ये लोकप्रिय ठरले आहेत, असे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर खोचक टीका केली आहे.
पुढे ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी चीनबाबत सातत्याने बोलताहेत. त्यामुळे ते चीनमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. चीनने भारतीय भूभागात घुसखोरी केली नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले, पण त्यांच्या या वक्तव्यामुळे भारतीय जवानांचं मनोबल ढासळलं आहे, असा आरोपही चव्हाणांनी मोदींवर केला.
गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांबरोबर झालेल्या झटापटीवर आम्हाला चिंता आहे आणि सीमेवर तैनात असलेल्या जवानांप्रती आम्हाला अभिमानही आहे, असं मोदींनी म्हटलं होतं.
तर सीमेचं रक्षण करणं आणि घुसखोरी रोखणं ही सरकारची प्रमुख जबाबदारी आहे. काँग्रेसने हा मुद्दा सातत्याने उचलून धरला. पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचीही खंत यावेळी चव्हाण यांनी बोलून दाखवली.
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!