
| मुंबई | सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ७ जुलै रोजी त्यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार असल्याचे समजते. यावेळी अभिनेते सिध्देश्वर झाडबुके, लावणीसमाज्ञी शकुंतलाताई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, अभिनेते विनोद खेडेकर, लेखक दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम, निर्माते संतोष साखरे हेदेखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, एका वृत्तपत्राशी बोलताना प्रिया बेर्डे यांनी या बातमीला दुजोरा दिल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास मला चित्रपटसृष्टीत पडद्यामागे राहून काम करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी करता येईल, असे प्रिया बेर्डे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रिया बेर्डे यांची नियुक्ती होणार आहे. प्रिया बेर्डे सध्या पुण्यातच लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचा कारभार चालवत आहेत. त्यामुळे आपण पुण्यातूनच नव्या कामाला सुरुवात करणार असल्याचे प्रिया बेर्डे यांनी सांगितले.
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!