खासदार डॉ.शिंदे यांचा अभिमानास्पद निर्णय..!

ठाणे :- राज्यासह ठाणे जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्णांचा तसेच कोरोना बाधित नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा आकडा वाढतच चालला आहे. या कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता प्रत्येकजण युद्ध पातळीवर कार्यरत आहे आणि राज्य सरकार वेळोवेळी अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजना राबवत आहेत.

या उपाययोजना राबवत असताना सरकारी तिजोरीवर त्याचा खूप मोठा ताण पडत आहे. यासाठी हातभार म्हणून खारीचा वाटा उचलत कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने कोरोनाविरोधातील लढण्याकरिता आपल्या खासदार निधीतून 50 लाख रुपयांचा निधी ठाण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त केला आहे.

आपण सर्वांनी एकजुटीने या कोरोनाव्हायरस च्या लढ्यात राज्य सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आपापल्यापरीने सहभाग घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी सर्वपक्षीय खासदार, आमदार, नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य आणि लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांना यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *