मुख्यमंत्री सहाय्यता निधीला कोरोनाच्या लढाईत ही छोटीशी आर्थिक मदत प्राथमिक शिक्षकांच्या सहभागाने करता आली व भविष्यात देखील गरज भासल्यास पुन्हा मदत केली जाईल असे परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांनी सांगितले. या विषाणूजन्य लढयात जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक तन-मन-धनाने शासनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत, राहतील. |
| अहमदनगर | महाराष्ट्र राज्यात सध्या मुख्यमंत्री उध्ववजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे समर्थ नेतृत्वाखाली कोरोना संसर्गाच्या संकटावर सक्षमपणे मात करत आहोत. शासकीय कर्मचारी शासनाच्या आदेशानुसार मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक मदत करणारच आहेत, परंतू अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक परिषद व गुरुमाऊली मंडळ पदाधिकारी यांनी केवळ सोशल मिडियाच्या माध्यमातून आवाहन करुन या सहाय्यता निधीसाठी २ लाख ३४ हजारांची मदत जमा केली.
ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी डी.डी .च्या स्वरूपात जिल्हा परिषद अध्यक्षा ना.राजश्रीताई घुले, अर्थ समिती सभापती सुनिल गडाख, कृषी समिती सभापती काशिनाथ दाते, महिला बालकल्याण सभापती मिराताई शेटे, अति.मुख्य.कार्यकारी अधिकारी जग्गनाथ भोर, लेखाधिकारी अनारसे साहेब, उप.मुख्य कार्य.अधि.वासुदेव सोळंकी, प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, सांगळे साहेब यांचेकडे शिक्षक परिषदेचे राज्यसंपर्क प्रमुख रावसाहेब रोहोकले यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आली.
यावेळी जि.प अध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी शिक्षक परिषदेने राबविलेल्या उपक्रमाबद्दल व शासनास केलेल्या मदतीबद्दल संघटना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले त्याचप्रमाणे जिल्हयातील शिक्षक अशा संवेदनशील प्रसंगात नेहमीच मदतीसाठी पुढे असतात, असेही सांगितले. यावेळी संघटना प्रतिनिधी प्रविण ठुबे, विकास डावखरे, संजय शिंदे, बाबा पवार, बाळासाहेब नवले आदी प्रतिनिधी प्रातिनिधीक स्वरूपात उपस्थित होते.