| नवी दिल्ली | कोरोनाच्या लढाईत भारताने केलेल्या कामाचं कौतुक जागतिक स्तरावर केलं जात आहे. भारतानं कोरोनाला रोखण्यासाठी उचलेल्या पावलामुळे जगालाही मदत झाली आहे. याचेच फलित म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं आहे. हर्षवर्धन २२ मे रोजी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती मिळते.
हर्षवर्धन यांची जपानचे डॉक्टर हिरोकी नकाटानी यांच्या जागी नियुक्ती करण्यात येणार आहे. सध्या ३४ सदस्य असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या बोर्डाचे ते अध्यक्ष आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे दक्षिण पूर्व आशिया समुहाने गेल्या वर्षी सर्वानुमते निर्णय घेतला होता की, भारताला तीन वर्षांसाठी कार्यकारी मंडळावर निवडलं जावं.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन यांची निवड २२ मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी बोर्डाच्या बैठकीत होईल. क्षेत्रीय गटांमध्ये अध्यक्ष पद एक वर्षासाठी दिलं जातं. गेल्या वर्षी हे ठरवण्यात आलं होतं. येत्या शुक्रवारपासून यातील पहिलं वर्ष सुरू होणार असून यासाठी भारताचा प्रतिनिधी कार्यकारी बोर्डाचा अध्यक्ष असणार आहे.
सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ७३ व्या जागतिक आरोग्य सभेत हर्षवर्धन यांनी सांगितलं की, कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी आम्ही वेळेत सर्व आवश्यक ती पावले उचलली. तसंच कोरोनाला रोखण्यासाठी चांगली कामगिरी केली असून पुढच्या काही महिन्यात आणखी चांगलं करू असा विश्वासही दर्शवला होता.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा