अभिमानास्पद : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची WHO च्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड..!

| नवी दिल्ली | कोरोनाच्या लढाईत भारताने केलेल्या कामाचं कौतुक जागतिक स्तरावर केलं जात आहे. भारतानं कोरोनाला रोखण्यासाठी उचलेल्या पावलामुळे जगालाही मदत झाली आहे. याचेच फलित म्हणून  केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं आहे. हर्षवर्धन २२ मे रोजी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती मिळते. 

हर्षवर्धन यांची जपानचे डॉक्टर हिरोकी नकाटानी यांच्या जागी नियुक्ती करण्यात येणार आहे. सध्या ३४ सदस्य असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या बोर्डाचे ते अध्यक्ष आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे दक्षिण पूर्व आशिया समुहाने गेल्या वर्षी सर्वानुमते निर्णय घेतला होता की, भारताला तीन वर्षांसाठी कार्यकारी मंडळावर निवडलं जावं.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन यांची निवड २२ मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी बोर्डाच्या बैठकीत होईल. क्षेत्रीय गटांमध्ये अध्यक्ष पद एक वर्षासाठी दिलं जातं. गेल्या वर्षी हे ठरवण्यात आलं होतं. येत्या शुक्रवारपासून यातील पहिलं वर्ष सुरू होणार असून यासाठी भारताचा प्रतिनिधी कार्यकारी बोर्डाचा अध्यक्ष असणार आहे.

सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ७३ व्या जागतिक आरोग्य सभेत हर्षवर्धन यांनी सांगितलं की, कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी आम्ही वेळेत सर्व आवश्यक ती पावले उचलली. तसंच कोरोनाला रोखण्यासाठी चांगली कामगिरी केली असून पुढच्या काही महिन्यात आणखी चांगलं करू असा विश्वासही दर्शवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *