पुतीन यांनी लोकप्रियता टिकून, २०३६ पर्यंत राहणार राष्ट्राध्यक्ष..!

| मुंबई / मॉस्को | रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना २०३६ पर्यंत पदावर कायम राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुतिन यांनी पदावर कायम राहावं, यासाठी घटनादुरुस्ती करण्यात आली होती. त्या घटनादुरुस्तीवर आठवडाभर मतदान प्रक्रियाही चालली, जी बुधवारी पूर्ण झाली. ही मोहीम ७ दिवस सुरू होती. २२ एप्रिल रोजीच हे मतदान घेण्यात येणार होते; परंतु कोरोनाच्या उद्रेकामुळे ते पुढे ढकलण्यात आले. मतदानाची तारीख १ जुलै ही जाहीर करण्यात आली होती; परंतु मतदान केंद्रे एक आठवडाआधीच उघडण्यात आली. मुख्य मतदानाच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाइन पद्धतीनंही जनतेनं मतं नोंदवली आहेत.

या मतदानात सुमारे ९८ टक्के मतदारांनी मतदान केले. या मतदान प्रक्रियेत विद्यमान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना २०३६ पर्यंत पदावर ठेवण्यासाठी रशियाच्या जनतेने पाठिंबा व विरोध दर्शविला. रशियावर दोन दशकांपासून शासन करणा-या ६७ वर्षीय अध्यक्ष पुतिन यांचा कार्यकाळ वर्ष २०२४ मध्ये संपुष्टात येणार आहे. परंतु त्यांना पुढील दोन कार्यकाळांमध्ये सत्तेवर राहता यावे, यासाठी ही घटना दुरुस्ती करण्यात आली. या घटनादुरुस्तीला ७८ टक्के लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे, तर २१ टक्के लोकांनी त्याच्याविरोधात मतदान केलं आहे. या घटनादुरुस्तीला मंजुरी मिळाल्याचं केबीसी अधिका-यांनी सांगितलं. त्यामुळे पुतिन यांना पुन्हा सहा-सहा वर्षांसाठी सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हणजे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे ६७ वर्षांचे आहेत, त्यांना आता वय वर्ष ८३ असेपर्यंत रशियाच्या अध्यक्षपदावर राहता येणार आहे. रशियात राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *