
| नवी दिल्ली | सध्या पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरु आहे. तिथे काही भागांमध्ये दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने उभे ठाकले आहे. यावरुन आता देशात राजकारण देखील पेटलं आहे. भारताचे गृहमंत्री अमित शाह यांना काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना शायराना अंदाजात उत्तर दिलं आहे. गालिबच्या सबको मालूम है जन्नत की हकीकत लेकीन.. या प्रसिद्ध शायरीवरुन प्रेरणा घेत राहुल गांधी यांनी, ‘सब को मालूम है ‘सीमा’ की हक़ीक़त लेकिन,दिल के ख़ुश रखने को, ‘शाह-यद’ ये ख़्याल अच्छा है’, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. .(rahul Gandhi on amit shah)
सब को मालूम है ‘सीमा’ की हक़ीक़त लेकिन,
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 8, 2020
दिल के ख़ुश रखने को, ‘शाह-यद’ ये ख़्याल अच्छा है।https://t.co/cxo9mgQx5K
काल साधारण साडे चार वाजता गृहमंत्री अमित शाह यांनी चीन बरोबर सुरु असलेल्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या संरक्षण धोरणाचे समर्थन करत एक वक्तव्य केलं होतं. भारताच्या संरक्षण धोरणाला जागतिक मान्यता मिळाली आहे. अमेरिका आणि इस्रायलनंतर आपल्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी कुठला देश सक्षम असेल तर, तो भारत आहे. संपूर्ण जगाने हे मान्य केले आहे, असं अमित शाह यांनी बिहारमधील डिजिटल सभेला संबोधित म्हटलं होता. अमित शाह यांचे हे वक्तव्य कोट करत राहुल गांधी यांनी शायरीच्या माध्यमातून टोला लगावला आहे.
दरम्यान, भारत आणि चीनमध्ये लष्करी प्रोटोकॉलनुसार फील्ड स्तरावरची सर्वोच्च बैठक पार पडली. गेल्या महिनाभरापासून चीन सीमेवर वाढलेल्या तणावाचा प्रश्न संवादानं मिटवण्याचा प्रयत्न दोन्ही देशांकडून झाला. भारताकडून ले जनरल हरिंदर सिंह यांनी या बैठकीत सहभाग घेतला होता.(rahul Gandhi on amit shah)
- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार
- वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..
- नेते अविनाश दौंड यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर..!