| मुंबई | महाराष्ट्रापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशा या परिस्थितीत पावसाळी अधिवेशन जून महिन्यात घेण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. यंदाचे पावसाळी अधिवेशन हे ३ ऑगस्ट रोजी होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज विधान भवनात विधानसभा आणि विधानपरिषद कामकाजाच्या सल्लागार समितीसोबत बैठक पार पडली. विधान भवनाच्या हिरवळीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत पावसाळी अधिवेशन किती दिवसांचे घ्यावे यावर महत्वाची चर्चा झाली. राज्यात सुरू असलेला कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव लक्षात घेता. एक किंवा दोन आठवड्यांचे मर्यादीत असे हे अधिवेशन होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
२२ जूनपासून पावसाळी अधिवेशन होईल अशी शक्यता होती. परंतु, सध्याची परिस्थिती पाहता निर्णय पुढे ढकल्यात आला आहे. पावसाळी अधिवेशन आता ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. १५ दिवस हे अधिवेशन चालणार आहे. २२ जूनपासून पावसाळी अधिवेशन घेणं कठीण आहे. त्यामुळे ३ ऑगस्टपासून हे पावसाळी अधिवेशन होईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
तसंच, ‘पुरवणी मागणी मंजूर करून घेण्यासाठी एक दिवसाचे अधिवेशन देखील घेतले जाऊ शकते, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या अधिवेशनात दोन्ही सभागृहातील सदस्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहण्यासाठीही नियोजन करण्यात येणार असल्याचं कळत आहे. विधान भवनात होत असलेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे तसेच मंत्री मंडळातील इतरही मंत्री उपस्थित होते.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .