राज ठाकरेंचा योगींवर निशाना..!

| मुंबई | उत्तरप्रदेश सरकारची परवानगी घेऊनच यापुढे इतर राज्यांना मजूर उपलब्ध केले जातील, अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सुनावले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, [su_highlighgt]उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल तर ह्यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलीसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ ह्यांनी लक्षात ठेवावं. तसंच महाराष्ट्र राज्य सरकारनेही ह्या गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं.[/su_highlight]

ह्यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा हा कटाक्ष महाराष्ट्रानं पाळावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *