वाचा – २० एप्रिल नंतर काय होणार चालू नि काय राहणार बंद..!
केंद्र सरकारचा इत्यंभूत माहिती देणारा शासन निर्णय आला..!


  • २० एप्रिलपासून देशात काय सुरु असेल आणि काय बंद असेल याबद्दल आज केंद्र सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २३ मार्चला २१ दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला होता. काल म्हणजेच १४ एप्रिलला या लॉकडाऊन पूर्ण झाला. मात्र कोरोना बधितांची कमी न होणारी संख्या पाहता केंद्र सरकारकडून लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्र सरकारनं देशात कुठे किती कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत हे बघून केंद्र सरकारकडून कमी रुग्ण असलेल्या ठिकाणी लॉकडाऊन शिथिल करण्यात सशर्त परवानगी देता येणार आहे.

काल देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संबंधीच्या काही सूचना दिल्या आहेत. यामध्ये २० एप्रिलपासून देशात काय सुरु असेल आणि काय बंद असेल याबद्दल आज केंद्र सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

२० एप्रिलपासून ‘या’ गोष्टी सुरु आहे सशर्त परवानगी

१. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं
२. जीवनावश्यक वस्तूंची मालवाहतूक करणारे ट्रक, ट्रक्सचे गॅरेजेस
३. शेतीसंबंधीची सर्व कामं, खत आणि कीटकनाशकांची विक्री करणारी दुकानं
४. मत्स्य व्यवसाय
५. सिंचन प्रकल्प
६. मनरेगाची कामं
७. डिजिटल व्यवहार
८. आयटी सेवा आणि कॉल सेंटर्स
९. कुरिअर सेवा
१०. ऑनलाईन शिक्षण
११. सरकारी कार्यालयं
१२. आरोग्य सेवा
१३. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी राहण्याची व्यवस्था करणारे हॉटेल्स, क्वारंटाईन सेंटर्स
१४. इलेक्ट्रिशियन, प्लम्बर्स, मोटार मेकॅनिक्स, IT सुविधा देणारे कर्मचारी

२० एप्रिलनंतरही हे बंदच राहणार

१. सिनेमागृहं आणि मॉल्स, जिम, स्विमिंग पूल्स , थिएटर्स , स्पोर्ट्स सेंटर्स
२. आदरातिथ्य म्हणजेच हॉस्पिटॅलिटी सेवा, बार्स
३. सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्रीडा कार्यक्रम
४. जिल्ह्यांतर्गत आणि राज्यांतर्गत प्रवासी रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतूक
५. रिक्षा किंवा टॅक्सी सर्व्हिस
६. शाळा, महाविद्यालयं आणि सर्व शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस

केंद्र सरकारकडून या संदर्भातील एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलंय. दरम्यान या सर्व सुविधा सशर्त सुरु करण्यात देण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी जास्त कोरोना रुग्ण आहेत के भाग सील करण्यात आलेले आहेत या ठिकाणी या सुविधा सुरु करता येणार नसल्याचं या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *