| नवी दिल्ली | कोरोनाचे वाढते संकट, त्यातच आता भारतात पूर्वेकडे पूर परिस्थिती तर उत्तरेकडे दिल्लीत होरपळवणा-या उन्हाने गेल्या १८ वर्षांचा रेकॉर्ड तोडला. सकाळी-सायंकाळी गर्मी पासून मिळणारी सुटकाही आता दुर्लभ झाली आहे. राजस्थानमधील चुरू हे जगातील सर्वात उष्ण ठिकाण ठरले. येथे पारा ५० अंशांवर नोंदवला गेला.
दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही उष्णतेने कळस गाठला. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, राजस्थानाहून येणा-या उष्ण वा-यामुळे उत्तरेकडे वातावरणात उष्मा वाढला आहे.
उत्तर आणि मध्य भारताच्या अनेक भागांमध्ये सध्या आलेली उष्णतेची लाट येत्या २४ तासांपर्यंत कायम राहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने बुधवारी सांगितले. दरम्यान, आग्नेय मोसमी वा-यांनी बंगालच्या उपसागरात आणखी पुढे मार्गक्रमण केले आहे.
उत्तर व मध्य भारत सध्या उष्णतेच्या तीव्र लाटेत होरपळत असून, काही ठिकाणी तापमान ४७ अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेले आहे. वायव्य भारत, मध्य भारत आणि पूर्व भारताचे लगतचे भाग यांवर उत्तर-पश्चिम दिशेने वाहणा-या कोरड्या वा-यांमुळे सध्याची उष्णतेच्या लाटेची परिस्थिती येत्या २४ तासांमध्ये कायम राहण्याची मोठी शक्यता आहे. अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची ही परिस्थिती राहील आणि विदर्भ आणि पश्चिम राजस्थान या भागांमध्ये तुरळक ठिकाणी अति तीव्र उष्णतेची लाट येईल, असे हवामान खात्याने सांगितले.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री