वाचा : हे आहेत मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

| मुंबई | महाविकास आघाडी प्रणित ठाकरे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोना आणि अनलॉकिंगच्या पार्श्वभूमीवर या मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ९ निर्णय घेण्यात आले. महत्वाचं म्हणजे आणखी तीन महिने शिवभोजन थाळीची किंमत १० रुपयांवरुन ५ रुपयांवर करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांसाठी शिवभोजन थाळी अवघ्या ५ रुपयांत मिळणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय खालीलप्रमाणे –

१. मुंबई उपनगरातील जुहू बिचवरील खाद्यपेये विक्रेते को.ऑप.सोसायटी लि. यांना भाडेपट्टयाने मंजूर केलेल्या जमिनीच्या भुईभाडयाच्या दराबाबत निर्णय.

२. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ कलम २६, १४८-अ मध्ये सुधारणा अध्यादेश प्रख्यापित करण्यास मान्यता.

३. जल जीवन मिशन

४. राज्यातील लॉकडाऊन परिस्थितीत निर्माण झालेल्या अतिरिक्त दूधाच्या नियोजनाच्या योजनेस मुदतवाढीचा निर्णय.

५. कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे ” आता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग,” असे नामकरण.

६. आयडीबीआय बँक, महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँक या शासकीय मालकीच्या बँकांना तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास परवानगी

७. शिवभोजन थाळीचा दर पुढील 3 महिन्यांसाठी 5 रुपये एवढा करणे

८. एपीएल केशरी शिधापत्रिका धारकांना जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य देणार

९. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम टप्पा २ राज्यात राबविणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *