वाचा : आजपासून हे आहेत आर्थिक बाबींशी निगडित बदल..

| मुंबई | कोरोना व्हायरसच्या संकटकाळात १ जुलैपासून आर्थिक आणि बँकिंग व्यवहारात होणाऱ्या बदलामुळे तुमच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. हे नियम अशावेळी माहित असणे आवश्यक आहे. या बदलणाऱ्या नियमांमध्ये आर्थिक वर्ष २०१९ साठी इनकम टॅक्स रिफंड देण्यापासून ते स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये वार्षिक डिपॉझिट भरणे तसंच पॅन-आधार लिंक करण्यापर्यंतच्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे.

१. म्युच्यूअल फंड खरेदीवर लागेल स्टँप ड्यूटी

जर १ जुलैपासून तुम्ही म्युच्यूअल फंड खरेदी करणार असाल तर त्यावर स्टँप ड्यूटी द्यावी लागेल. जर SIP (Systematic Investment Plan) आणि STP (Systematic Transfer Plan) खरेदी करणार असाल तरी देखील स्टँप ड्यूटी द्यावी लागेल. म्युच्यूअल फंड किंवा इक्विटी म्युच्यूअल फंड कोणत्याही प्रकारच्या खरेदीवर ही ड्यूटी द्यावी लागणार आहे. याचा सर्वाधिक परिणाम डेट्स फंडवर होईल, जे साधारणपणे छोट्या काळासाठी असतात. या नियमानुसाप म्युच्यूअर फंड खरेदी केल्यानंतर एकूण गुंतवणुकीच्या ०.००५ टक्के रक्कम तुम्हाला स्टँप ड्यूटी द्यावी लागेल.

२. नवीन कंपन्यांच्या ऑनलाइन रजिस्ट्रेशनचा नियम सोपा

१ जुलैपासून नवीन कंपन्यांची नोंदणी सोप्या पद्धतीने घरबसल्या ऑनलाइन करता येईल. सरकारने सेल्फ डिक्लेरेशनच्या आधारावर कंपनीच्या नोंदणीचे दिशानिर्देश जारी केले आहेत. आजपासून हे नियम लागू होत आहेत. कंपनीचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी अनेक कागदपत्रे जोडावी लागतात. १ जून रोजी उद्योग मंत्रालयाकडून गुंतवणूक त्याचप्रमाणे व्यवसायाच्या आधारावर MSME च्या वर्गीकरणाचे नवीन मानदंडांची अधिसूचना जारी केली आहे. आजपासून हे नियम लागू होतील.

३. PNB बचत खात्यावर मिळणार कमी व्याज

पंजाब नॅशनल बँक (PNB) च्या बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजात ०.५० टक्के कपात करण्यात आली आहे. १ जुलैपासून ग्राहकांना ३.२५ टक्के व्याज मिळणार आहे. ग्राहकांना बचत खात्यामध्ये ५० लाखांपर्यंत रक्कम असल्यास वार्षिक ३ टक्के तर त्यापेक्षा जास्त रक्कम असल्यास वार्षिक ३.२५ टक्के व्याजदर मिळेल. याआधी SBI आणि कोटक महिंद्रा बँकेने देखील व्याजदरामध्ये कपात केली होती.

४. ATM विड्रॉलसाठी शूल्क

लॉकडाऊन लागू झाल्यानंतर केंद्र सरकारने एटीएमधून पैसे काढताना आकारण्यात येणाऱ्या शुल्कावर सूट दिली होती. ३ महिन्यासाठी कोणत्याही बँकेच्या एटीएममधून विनाशूल्क रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आली होती. यासाठी ३० जून २०२० ही डेडलाइन आहे. त्यामुळे १ जुलैपासून ठराविक ट्रान्झाक्शननंतर तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्यासासाठी ठराविक रक्कम द्यावी लागणार आहे. साधारणपणे कोणतीही बँक एका महिन्यात ५ वेळा फ्री ट्रान्झॅक्शन करण्याची परवानगी देते. दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून ३ वेळा विनाशूल्क रक्कम काढता येते. या मर्यादेनंतर बँका अतिरिक्त ८ ते २० रुपयांचे शूल्क आकारतात.

५. ‘सबका विश्वास योजने’चा लाभ मिळणार नाही

सर्व्हिस टॅक्स आणि केंद्रीय उत्पादन शूल्क संबधित जुन्या प्रकरणातील विवादांचे समाधान करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सबका विश्वास योजने’चं पेमेंट करण्यासाठी देखील ३० जून ही डेडलाइन आहे.

६. बदलणार LPG घरगुती गॅस, ATF च्या किंमती

तेल मार्केटिंग कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी घरगुती गॅस आणि एटीएफच्या नवीन किंमतींच्या घोषणा करतात. गेल्या काही महिन्यांपासून या किंमतीमध्ये वाढ होत आहे.

७. सुरू होणार अनलॉक २

सरकारने अनलॉक १ नंतर सोमवारी रात्री अनलॉक २ साठी दिशानिर्देश जारी केले आहेत. यामध्ये अद्याप शैक्षणिक संस्था, शाळा आणि कॉलेज ३१ जुलैपर्यंत बंद असणार आहेत. दरम्यान महाराष्ट्रामध्ये ३१ जुलैपर्यंत सशर्त लॉकडाऊन असणार आहे.

८. खात्यामध्ये कमीतकमी शिल्लक (Minimum Balance) ठेवणे आवश्यक

१ जुलैपासून तुमच्या खात्यामध्ये कमीतकमी शिल्लक रक्कम नसल्यास बँकेकडून दंड आकारला जाऊ शकतो. एप्रिल ते जून दरम्यान याकरता सूट देण्यात आली होती. ही सूट वाढवण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

९. पीएफमधून खात्यातून पैसे काढणे आजपासून सोपे नाही

कर्मचारी भविष्य निधी संघटनेने(EPFO) त्यांच्या खातेधारकांना एक ठराविक रक्कम काढण्यासाठी सूट दिली होती. ३० जूनपर्यंत ही डेडलाइन आहे. त्यामुळे १ जुलैनंतर तुम्ही पीएफ अॅडव्हान्स क्लेम करू शकत नाही.

१०. SMS च्या माध्यमातून Nil ​GST रिटर्न फाइल करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *