आता सरसंचालक भागवत ही करणार फेसबूक live..!


  • दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : गुरुवार, २३ एप्रिल.

| नागपूर | सरसंघचालक मोहन भागवत हे येत्या रविवारी २६ एप्रिल रोजी स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत. मोहन भागवत हे संध्याकाळी ५ वाजता ऑनलाईन माध्यमाद्वारे स्वयंसेवकांशी संवाद साधतील. ‘सद्य:स्थिती आणि आमची भूमिका’ या विषयावर ते स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून आणि यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूरच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या संपूर्ण देश कोरोना व्हायरसच्या संकटाला सामोरा जात आहे. हे संकट अतिशय गंभीर असले तरी समाजाकडून मिळणारा प्रतिसादही उत्तम आहे.

या संकटकाळात भारत हा संपूर्ण जगासमोर एक उत्तम उदाहरण म्हणून उभा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकदेखील एकत्र येत समाजाप्रती आपले योगदान देत आहेत. सद्य परिस्थिती ध्यानात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूरच्या वतीने अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत हे स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सांगण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *