… तर सामना प्रेसवर येऊन पाया पडेल..!
मनसे नेत्याची प्रतिक्रिया..!

| मुंबई | मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “राऊत साहेब जर महाराष्ट्रातील रुग्णांची अवस्था सुधारली तर तुम्हीही सोनू सूदप्रमाणे प्रसिद्ध होऊ शकतात” असे देशपांडे म्हणाले आहेत. तसेच, “जर तुम्ही कोरोना रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले, तर मी स्वत: सामना प्रेसवर येऊन तुमच्या पाया पडायला तयार आहे”, असेही देशपांडे म्हणालेत.

संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून याद्वारे संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे. “राऊतसाहेब सध्या महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. एकतर आपल्या टेस्ट होत नाहीत. टेस्ट झाल्या तर रुग्णवाहिका मिळत नाही. रुग्णवाहिका मिळाली तर सरकारी रुग्णालयात जागा मिळत नाही…. आणि जागा मिळाली तर सरकारी रुग्णालयांची परिस्थिती वाईट आहे… प्रायव्हेट वाले वाटेल ते बील आकारतायेत…अशी सध्या रुग्णांची अवस्था आहे. मला असं वाटतं आपण ही जर रुग्णांची अवस्था सुधारली तर आपणही सोनू सूदसारखे फेमस होऊ शकता. सर्वात महत्त्वाचे जर आपणही या रुग्णांना दिलासा देण्याचे काम जर केलं, तर मी स्वत: सामना प्रेसवर येऊन तुमच्या पाया पडायला तयार आहे,” असे संदीप देशपांडे यांनी व्हिडीओत म्हटले आहे.(sandeep deshpande vs sanjay raut)

लॉकडाउनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी सुखरुप पोहोचवण्याचं काम करणारा अभिनेता सोनू सूद याला अप्रत्यक्षपणे भाजपाचा पाठींबा असल्याचा संशय राऊत यांनी सामना मधून व्यक्त केला होता. दरम्यान, संजय राऊत यांनी सोनूच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याच्या पार्श्वभूमीवर सोनू सूदने रविवारी रात्री ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती..(sandeep deshpande vs sanjay raut)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *