महाराष्ट्रात सता परिवर्तन अशक्य – जयंत पाटील

| मुंबई | महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही. आमच्या तिन्ही पक्षांची ताकद मोठी आहे. आमच्या एका जरी आमदाराने राजीनामा दिला तर परत निवडून येण्याची त्याची ताकद नाही. आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित असल्यामुळे आमच्या सरकारला धोका नसल्याचा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. सध्या महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याची आवई उठवली जात आहे.

शिवाय राजस्थानचे काँग्रेस सरकारही अस्थिर झाले असल्याबद्दल पाटील यांना छेडले असता ते म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आव्हान कधीही स्वीकारण्यास आम्ही तयार आहोत. त्यांनी निवडणुकीसाठी तयार राहावे. सध्याची महाराष्ट्रातील भाजपची स्थिती पाहता इतर राज्यांप्रमाणे भाजपला महाराष्ट्रात दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडून सत्ता परिवर्तन घडवून आणणे अशक्य असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *