पहा : आताच निसर्ग वादळाचे असणारे रौद्र रूप..!

| कोकण / ठाणे | निसर्ग चक्रीवादळ जसजसं महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ पोहोचत आहे, तसतसं या वादळामुळं वातावरणात बदल होत आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अलिबाग, मुंबईसह मंगळवारी सायंकाळपासूनच रत्नागिरीतही पावसाला सुरूवात झाली आहे.

बुधवारी सकाळच्या सुमारास म्हणजेच वादळ धडकणार असल्याच्या दिवशी ANI वृत्तसंस्थेकडून रत्नागिरीतील एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. या व्हिडिओमध्ये चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील उत्तरेकडी भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाऱ्याचं स्वरुप इतकं रौद्र आहे की मोठमोठे वृक्षही या वाऱ्यामध्ये हेलकावे खात असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.(Nisarag cyclone)

वादळी वारे घोंगावत असल्यामुळं रत्नागिरीमध्ये नागरिकांनीही घरातच राहणं पसंत केलं आहे. दरम्यान, रत्नागिरीमध्ये सध्या ताशी १३ किलोमीटर वेगानं हे वादळ किनाऱ्याच्या दिशेनं पुढे जात आहे. थोडक्यात वादळाचा हा वेग क्षणाक्षणाला वाढत आहे. परिणामी अनेक वृक्ष उन्मळूनही पडल्याचं पाहायला मिळत आहे.

रत्नागिरी आणि परिसरामध्ये असणारं वादळाचं हे स्वरुप पाहता प्रशासनाकडून किनारी भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय बहुतांश नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीतही करण्यात आलं आहे. समुद्राला उधाण आलं असल्यामुंळ येथील किनाऱ्यांवर लाटांचा मारा सुरु असल्याचं पाहायाला मिळत आहे. (Nisarag cyclone)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *