वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..

| अहमदनगर | गेल्या तीन वर्षापासून अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव धूळ खात पडून आहेत, तसेच त्यानंतरच्या ही वर्षभरातील वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मागवले गेले नसल्याने शिक्षकांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे, यामुळे शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. निवडश्रेणी बाबत कोणतीही हालचाल जिल्हा परिषदेकडून होत नाही, याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी कोणावर तरी निश्चित करावी व लवकरात लवकर वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजूर करावेत, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे पत्र संघटनेकडून प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी मागणी करताना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठोकळ, सल्लागार नाना गाढवे पारनेर तालुका अध्यक्ष बाबासाहेब धरम, नगर तालुका कार्याध्यक्ष तथा शिक्षकांसाठी सातत्याने काम करणारे शरद कोतकर तथा इतर शिलेदार उपस्थित होते. पुढील १५ दिवसांत प्रस्ताव मंजूर न झालेस जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात येण्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली तथा कुणाच्या या संदर्भाने समस्या असल्यास संघटनेतील पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेने केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.