राजनाथ सिंह यांच्यावर शरद पवार , अरविंद सावंत यांचा पलटवार..!

| मुंबई | उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारला सर्कस म्हणणाऱ्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना शिवसेनेनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी लडाखच्या सीमेवर काय चालले आहे याकडे लक्ष द्यावे, असं प्रत्युत्तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिले आहे.

महाराष्ट्रात चांगला कारभार चालू आहे. मध्य प्रदेश आणि काश्मीरमध्ये भाजपने काय केले? आता गुजरातमध्ये ते काय करत आहेत? ती खऱ्या अर्थाने सर्कस आहे, अशी टीका खासदार अरविंद सावंत यांनी केली. राज्यात सत्ता न मिळाल्याने भाजपच्या राज्यातील नेत्यांची तडफड दिसत होती. आता केंद्रातील नेत्यांचीही तडफड दिसत आहे, असं खासदार सावंत यांनी म्हटले आहे.(sharad pawar and arvind sawant on circus comment)

निवडणुकीनंतर शिवसेनेने सत्तेच्या लोभापोटी भाजपला धोका दिला. भाजप धोका खाईल, पण धोका देणार नाही, असं राजनाथ सिंह म्हणाले होते. त्यालाही खासदार सावंत यांनी प्रत्युत्तर दिले. शिवसेनेने धोका दिलं असं वारंवार खोटं सांगून ते गोबेल्स नीतीचा अवलंब करत आहेत. उलट भाजपनेच शिवसेनेला कित्येकदा धोका दिला आहे, असं अरविंद सावंत म्हणाले.  ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही असं म्हणणाऱ्यांनी आताची भाजपा अडवाणी आणि वाजपेयींची राहिली आहे का? हे सांगावे, असा खणखणीत टोला खासदार अरविंद सावंत यांनी लगावला. 

दरम्यान यावर शरद पवार यांनी देखील राजनाथ सिंह यांचा खरपूस समाचार घेतला आहे. आमच्या सर्कसमध्ये प्राणी आहेत, विदुषकाची कल्पनाही आहे.  पण, विदुषकाची मात्र कमतरता आहे, या शब्दांत त्यांनी राजनाथ सिंहांचा खरपुस समाराच घेतला तोही अगदी आपल्याच शैलीत.  निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसललेल्या कोकणातील वादळग्रस्त भागाला भेट देण्यासाठी म्हणून पाहणी दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली.(sharad pawar and arvind sawant on circus comment)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *