| मुंबई | कोरोना लॉकडाऊनच्या संकटात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पत्र लिहिलं आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये पवारांनी मोदींना लिहिलेलं हे तिसरं पत्र आहे. या पत्रात पवारांनी बांधकाम व्यवसायाच्या परिस्थितीबाबत लिहिलं आहे.
कोरोनामुळे देशातील बांधकाम व्यवसाय मोडकळीस आला आहे. मागील तीन महिन्यांपासून या क्षेत्रातील कामं बंद आहेत. त्यामुळे या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. या क्षेत्रातील मजुरांचे स्थलांतरही मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामुळे हे क्षेत्र अडचणीत आले आहे, त्याचा देशाच्या विकासदरावर परिणाम होत आहे. या व्यवसायाला अडचणीतून बाहेर आणण्यासाठी कर्जाचे पुनर्गठन, अतिरिक्त संस्थात्मक निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसंच त्यांचं व्याज माफ केले पाहिजे. बांधकाम क्षेत्रासाठी विशेष संयुक्तिक धोरणाचीही गरज आहे, असं पवारांनी या पत्रात लिहलेले आहे.I have written a letter to Hon. Prime Minister Shri. Narendra Modi to express my deep concern over the current scenario of Real Estate Sector in India, amidst the unprecedented pandemic #Covid_19 and consequent nationwide lockdown. @PMOIndia @narendramodi #coronavirus pic.twitter.com/9lYkUXOubV
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 28, 2020
बांधकाम व्यवसाय देशाच्या जीडीपीमध्येही मोठा हातभार लावतो, त्यामुळे राष्ट्रासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या मुद्द्यांमध्ये पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालावं आणि आवश्यक पावलं उचलावी, अशी विनंतीही पवारांनी केली आहे.
याआधी शरद पवारांनी अडचणीत असलेल्या साखर उद्योगाबाबत १५ मे आणि कृषी क्षेत्रातल्या संकटाबाबत १८ मे रोजी पत्र लिहिलं होतं. या दोन्ही पत्रांमध्ये पवारांनी पंतप्रधानांना काही उपाययोजनाही सुचवल्या होत्या. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीतही पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभाग घेतला होता.
एकंदरित , शरद पवार राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या सोबत समतोल साधत काम करत असल्याचे दिसत आहे. एक महत्वाचा दुवा म्हणून पवारांची भूमिका नेहमीच दिलासादायक राहिली आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री