महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये शिवसेनेची लाट..! भगवे आमचे रक्त तळपते तख्त हिँदवी बाणा, प्रचंड हिट..!

प्रतिक्रिया..!
परीक्षा रद्द करण्यात आल्याने माझ्यासारख्या अनेक तरुणांना आनंद वाटत आहे. आम्ही बाकी सेमीस्टर पास असल्याने ही एक सेमीस्टर नाही दिली म्हणजे खूप काही मोठा फरक पडत नाही. आमचा तो अभ्यासक्रम शिकून पूर्ण देखील झाला आहे. परंतु विद्यार्थी हिताचा, आरोग्याचा विचार ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला असल्याने माझ्यासहित लाखो तरुण नेहमीच शिवसेनेच्या ऋणात राहू..! मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, उदय सामंत , वरून सरदेसाई सर्वांचे आभार..!

– अनिकेत फापाळे, ठाणे

| मुंबई | एकाही विद्यार्थ्याला विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घ्या. त्यासाठी नेमकी परीक्षापद्धती आणि वेळापत्रक निश्चित करण्यासाठी विविध पर्याय पडताळून पाहवेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शनिवारी बैठकीत दिले होते. त्यानंतर काल त्यांनी पुन्हा आढावा घेऊन विद्यापीठातील अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत महत्वाची घोषणाही केली आहे.  अंतिम वर्षात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नसून त्यांना सरासरी पद्धतीने गुण दिले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. 

अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची आम्हाला चिंता आहे, म्हणून या सर्व विद्यार्थ्यांची गुणांची सरासरी करुन त्यांना अंतिम वर्षांच्या परीक्षेत गुण देण्यात येणार आहेत.  तसेच, ज्या विद्यार्थ्यांना या गुणांवर आक्षेप असेल, किंवा मला यापेक्षाही जास्त गुण मिळाले असते, असे वाटत असेल त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी सरकारतर्फे उपलब्ध करुन देण्यात येणार, असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

या निर्णयामुळे जवळपास ८ लाख विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्वत्र ठाकरे सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. शिवसेनेच्या समर्थनार्थ कित्येक मीमस देखील कालपासून सोशल मीडियात प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत. प्रत्येक कॉलेजच्या ग्रुप वर, इंस्टाग्राम वर शिवसेनेच्या स्तुतीचे गोडवे विद्यार्थ्यांकडून गायले जात आहेत. इतकचं काय तर व्हॉट्स ऍप, इंस्टाग्राम, फेसबुक मधील स्टेटस च्या माध्यमातून देखील असे अनेक मिमस सध्या चर्चेत आहेत.

शिवसेनेची तरुण विंग युवा सेना आणि युवा सेनेचे वरून सरदेसाई यांनी याबाबत आपली मागणी मंत्री उदय सामंत, आदित्य ठाकरे यांच्याकडे लावून धरली होती. म्हणून कालच्या निर्णयामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी शिवसेनेवर प्रचंडच खुश असल्याचे दिसून येत आहे. ‘ आयुष्यभर माझे मत शिवसेनेला, एकच पक्ष .. फक्त शिवसेना, आता नाद नाय करायचा सेनेचा यासहित कित्येक स्टेटस सध्या व्हायरल होत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ओवाळणी करणाऱ्या तरुण मुलाचा व्हिडिओ देखील प्रचंड प्रमाणात शेअर केला जात आहे.

एकंदरित, या निर्णयाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात सेनेबद्दल प्रचंड प्रमाणात आदर आणि प्रेम निर्माण झाले आहे हे नक्की. परंतु दुसरीकडे या निर्णयावरून ABVP ने नाराजी व्यक्त केली आहे.

4 Comments

  1. शैक्षणिक बाबतीत जास्त अनुभव नसतानाहीखूप चांगले आणि योग्य निर्णय मा. मुख्यमंत्री घेत आहेत.जय महाराष्ट्र.

    1. हे त्या निलेश राणे ला कोणीतरी सांगा

  2. 🙏बाळासाहेबांची शिकवण आहे खरंच उध्दव साहेब व राज साहेब यांनी खुप शांत व चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र सांभाळत आहेत धन्यवाद साहेब
    🚩💯आपलं सरकार ठाकरे सरकार 💯🚩
    💯🚩जय हिंद जय महाराष्ट्र🚩💯

  3. Uddhav saheb tumcha nirnay bhari ahe aditya saheb ani varun sardesai saheb ani uday sir tumhala purna ty cha mulana kadhun abhar vyakta karto tumha support asach rahudya me tumcha abhari ahe jay maharastra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *