लॉकडाऊनच्या काळात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष २४ तास रुग्णसेवेत कार्यरत…!


खा.डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सहकार्याने गरजू रुग्णांना करणार थेट मदत व गरजू रुग्णांना तात्काळ रक्तपुरवठा

मुंबई : कोरोनाचा पार्श्वभूमीवर १४ एप्रिल पर्यंत लॉकडाउन असल्याने मुंबई – ठाण्यात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची कोणत्याही प्रकारे गैरसोय न होता त्यांना तात्काळ मदत करण्यासाठी ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची’ टीम गेल्या काही दिवसांपासून या कठीण काळात देखील सज्ज आहे. गरजू व गोरगरीब रुग्णांनी कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय मदतीसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाद्वारे सुरू केलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन या आधीच राज्याचे नगरविकास मंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी केले होते तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व खा.डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून या लॉकडाऊनच्या काळात गेल्या काही दिवसांत ५० हुन अधिक रुग्णांना रक्तपुरवठा करण्यात आला तसेच १०० हुन अधिक गरजू रुग्णांना विविध हॉस्पिटलमध्ये शासकीय योजने अंतर्गत शस्त्रक्रिया व उपचार करण्यात सहाय्य करण्यात आल्याची माहिती खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली.

कॅन्सर, ब्रेन टुयमर, किडणी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, कॉकलियर इंप्लांट आदि नियोजित शस्त्रक्रिया करण्यासाठी राज्यातील अनेक रुग्ण मुंबईत येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यातील डिस्चार्ज मिळालेल्या अनेक रुग्णांना आपल्या मूळ गावी परतण्यासाठी तसेच आवश्यक औषधउपचार मिळण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. पुढे देखील या अडचणीच्या काळात गरजू रुग्णांना गावी परतण्यासाठी वाहन व्यवस्था किंवा प्रसंगी मुंबईतील संत गाडगेबाबा धर्मशाळा मध्ये राहण्याची आणि जेवणाची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. खा.डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सहकार्याने गरजू रुग्णांना तात्काळ रक्तपुरवठा करण्यासाठी मदत केली जाणार आहे.

तरी, गरजू रुग्णांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षच्या हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि खा.डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनचे विश्वस्त अभिजित दरेकर यांनी केले आहे.

हेल्पलाईन नंबर
022 – 25322525 / 67
( मंगेश चिवटे, कक्ष प्रमुख )
8907776002
( माऊली धुळगंडे, वैद्यकीय सहाय्यक )
9423902525
( निलेश देशमुख, वैद्यकीय सहाय्यक )
8275903030
( स्वरूप काकडे, वैद्यकीय सहाय्यक)
पत्ता- 1
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ,
मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालय.
मंगला हायस्कुल समोर, कोपरी, ठाणे ( पूर्व )
पत्ता – 2
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,
शिवसेना भवन, तळमजला, दादर ( पश्चिम )


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *