
| मुंबई | आपल्या रक्ताने, घामाने महाराष्ट्राला पाणी देणाऱ्या, उन्नत बनवणाऱ्या कामगारांना शिवसेना-कॉंग्रेस सरकारकडून छळ मिळाला आहे आणि या अमानवी व्यवहारासाठी उद्धव ठाकरे यांना जनता कधीच माफ करणार नाही, असे म्हणत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ ट्विट करत म्हटलं आहे की, योगी जी, जरा सुन और देख लीजिए .
योगी जी, जरा सुन और देख लीजिए। @myogioffice https://t.co/mIyn6L5ud4 pic.twitter.com/QDGrAfrqRr
— Shivsena Communication (@ShivsenaComms) May 24, 2020
काय आहे नेमक या व्हिडीओमधे :-
या व्हिडिओत महाराष्ट्रातून उत्तरप्रदेशात गेलेला एक तरूण कामगार आपली व्यथा सांगत आहे, ‘माझ्या दोन्ही बाजूनी पन्नास किलोमीटरवर लोकांच्या रांगाच रांगा आहेत. इथे कुणी पाणीसुद्धा पाजत नाहीये, आणि हे युपीमध्ये होत आहे. महाराष्ट्रात होतो तेव्हा लोकांनी खाऊ घातले, महाराष्ट्रात लोकांनी जी सेवा केली, ती कुणीच नाही केली. इथे आम्हाला पाणी दिलं जात नाहीये. गावच्या गावं खाली होत आहेत’. यावेळी त्या व्यक्तीसोबत असणारे सगळे लोक यावेळी याच पद्धतीने व्यथा मांडत आहेत. यावेळी सगळ्या लोकांनी महाराष्ट्रात दिलेल्या सोयी-सुविधांचे कौतुक केले आहे.[/highlight]
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा