| कोल्हापूर | दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा विधिवत पार पाडला जाईल. तसेच या परंपरेत खंड पडून देणार नाही, असे आश्वासन छत्रपती संभाजीराजे यांनी दिले आहे. सध्या राज्यात आणि देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडेल किंवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता छत्रपती संभाजीराजे यांनी या प्रथेत कोणताही खंड पडू देणार नसल्याचे म्हटले आहे.
‘एकच धून, ६ जून’ असे म्हणत महाराष्ट्राच्या अन् देशाच्या कानाकोप-यातून लाखो शिवभक्त कशाचीही पर्वा न करता दरवर्षी रायगडावर पोहोचत असतात. फक्त महाराजांचा राज्याभिषेक सोहळा डोळ्यांत साठवून घेण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करुन शिवभक्त गडावर येत असतात. गेली १४ वर्षे आपण हा सोहळा अगदी राजवैभवात संपन्न करत आहोत. शिवराज्याभिषेक सोहळा आता लोकोत्सव झाला आहे. देशभर किंबहुना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. गेल्या वर्षी ५ देशांचे राजदूत त्या त्या देशाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून राजसदरेवर महाराजांना मुजरा करण्यासाठी दाखल झाले होते, असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
एकच धून 6 जून।
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 10, 2020
असं म्हणत महाराष्ट्राच्या अन देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त कशाचीही पर्वा न करता दरवर्षी रायगडावर पोहोचत असतात. फक्त महाराजांचा राज्याभिषेक सोहळा डोळ्यांत साठवून घेण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करुन शिवभक्त गडावर येत असतात. pic.twitter.com/wlBzsde8fl
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .