एकच धून ६ जून..! यंदाही राज्याभिषेक दिन होणार साजरा..!

| कोल्हापूर | दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा विधिवत पार पाडला जाईल. तसेच या परंपरेत खंड पडून देणार नाही, असे आश्वासन छत्रपती संभाजीराजे यांनी दिले आहे.  सध्या राज्यात आणि देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडेल किंवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता छत्रपती संभाजीराजे यांनी या प्रथेत कोणताही खंड पडू देणार नसल्याचे म्हटले आहे. 

‘एकच धून, ६ जून’ असे म्हणत महाराष्ट्राच्या अन् देशाच्या कानाकोप-यातून लाखो शिवभक्त कशाचीही पर्वा न करता दरवर्षी रायगडावर पोहोचत असतात. फक्त महाराजांचा राज्याभिषेक सोहळा डोळ्यांत साठवून घेण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करुन शिवभक्त गडावर येत असतात. गेली १४ वर्षे आपण हा सोहळा अगदी राजवैभवात संपन्न करत आहोत. शिवराज्याभिषेक सोहळा आता लोकोत्सव झाला आहे. देशभर किंबहुना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. गेल्या वर्षी ५ देशांचे राजदूत त्या त्या देशाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून राजसदरेवर महाराजांना मुजरा करण्यासाठी दाखल झाले होते, असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *