इतके ई पास प्रलंबित…!
आतापर्यंत दोन लाख अर्जांना राज्यातल्या राज्यात प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे..


  • दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : मंगळवार , २१ एप्रिल

मुंबई : ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये अंशत: शिथिलता देण्यात आली आहे. त्यातच राज्यातल्या राज्यात प्रवासाची परवानगी मिळावी यासाठी पोलिसांकडे मोठ्या संख्येने अर्ज आले. आतापर्यंत अशा दोन लाख अर्जांना राज्यातल्या राज्यात प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर विविध कारणासाठी प्रवासाच्या परवानगीसाठी ७० हजार अर्ज प्रलंबित आहेत.

आपल्याच राज्यात एके ठिकाणाहून दुसरीकडे जायला परवानगी मागावी लागेल अस कधी कुणाला वाटलं नसेल, पण कोरोनाने ती वेळ आणली. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र लॉकडाऊन इतका वाढेल याची कल्पना नसल्याने अनेक जण आहे त्या ठिकाणी अडकले. आपल्या मुला-बाळांना गावाला पाठवलं होतं.

कोणी शहरात काम करतं आणि कुटुंबीय गावात अशी परिस्थिती निर्माण झाली. परीक्षा रद्द झाल्याने पालकांनी आपल्या मुलांना गावी पाठवलं होत. तर कोणी कामासाठी शहराबाहेर गेलं होतं. त्यामुळे किमान राज्यातल्या राज्यात प्रवास करण्याची परवानगी द्यावी, यासाठी पोलिसांकडे मोठ्या संख्येने अर्ज आले आहेत.

आतापर्यंत अशा दोन लाख अर्जांना राज्यातल्या राज्यात प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी देण्याचे अधिकार जिल्हा पातळीवरील प्रशासनाला दिले आहेत. मेडिकल इमर्जन्सी आणि घरात कुणाचे निधन झाले असल्यास या कारणासाठी फक्त पोलीस प्रवासासाठी परवानगी देत आहे. मात्र विविध कारणासाठी प्रवासाच्या परवानगीसाठी ७० हजार अर्ज प्रलंबित आहेत.

सरकार अतिमहत्त्वाच्या कारणांसाठी काही जणांना अटींसह प्रवासाची परवानगी देत आहे. त्यानुसार आतापर्यंत दोन लाख अर्जांना पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र अजूनही प्रवासाच्या परवानगीसाठी ७० हजार अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे सरकार यावर कोणता निर्णय घेणार हे पाहावं लागेल.

दरम्यान, देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्हाबंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांची वाहतूक वगळता सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *