सध्या सारथी ही संस्था चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिला ८ कोटींचा निधी देखील तात्काळ देवू केला आहे. लॉक डाऊन पूर्वी सारथी संस्थेबद्दल विविध प्रश्न घेऊन चालू असणारे उपोषण मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागण्या मान्य करून थांबवले होते. त्या मागण्यांना मूर्त स्वरूप आजच्या निर्णयाने आले आहे. तर नक्की काय आहे ही सारथी..!
१.सारथी काय आहे ?
सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था.. ही संस्था पुणे येथे कंपनी कायदा २०१३ अंतर्गत कलम ८ अन्वये नॉन प्रॉफिट कंपनी म्हणून स्थापन केली होती.
२. सारथी स्थापन करण्याचा उद्देश काय ?
सारथीची स्थापना मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी समुदाय आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांचा सामजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी, या समुदायाला प्रशिक्षण, मार्गदर्शन करण्यासाठी सारथीची स्थापना करण्यात आली.
३. शैक्षिणक क्षेत्रात विद्यार्थांना सारथी चा फायदा काय?
१. MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी:
या संस्थे अंतर्गत पुणे , दिल्ली येथे MPSC /UPSCचे क्लास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ” निःशुल्क कोचिंग”( अर्थात क्लासेसची पूर्ण फीस सारथी भरणार) ही योजना राबवली जाते. तसेच या विद्यार्थांना मासिक वेतन दिले जाते ( पुणेसाठी- ८००० प्रती महिना, दिल्ली -१३००० प्रती महिना).. २०१९ ला २२५ उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेतला होता. २०२० ला २५० उमेदवारांना प्रवेश दिला जाणार होता..
२. NET/SET च्या विद्यार्थ्यांसाठी:
MPSC प्रमाणेच NET/SET च्या विद्यार्थ्यांना ही ” निःशुल्क कोचिंग” योजनेचा आणि मासिक वेतनाचा लाभ घेता येतो.
३ M.phil/ P.hd Fellowship:
P.hd /M.phil ला registration असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.या योजेअंतर्गत P.hd साठी २५००० प्रती महिना ५ वर्ष, M.phil साठी २५००० प्रती महिना २ वर्ष fellowship मिळते.
४. मिलिटरी, पॅरा मिलिटरी, पोलिस फोर्स च्या विद्यार्थ्यांसाठी:
मिलिटरी, पॅरा मिलिटरी, पोलिस फोर्स मध्ये भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसठी दोन वर्षाचे निवासी निःशुल्क प्रशिक्षण.
५. CMSTRT fellowship:
Chief Minister Science and Technology Research Fellowship अंतर्गत पात्र उमेदवारांना ( १वर्ष – ७०००० प्रती महिना, २ वर्ष-७०००० प्रती महिना , ३ वर्ष ७५०००प्रती महिना ., ४ वर्ष ८००००प्रती महिना, ५ वर्ष ८००००प्रती महिना) Fellowship दिली जाते.
६) या बरोबरच सारथी तर्फे कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते कौशल्य पुर्ण अभ्यासक्रमाचे उपक्रम राबविण्यात येतात यातून युवकांना रोजगारास चालना मिळते महिला विकास, शेतीपूरक व्यवसाय निगडीत लघु उद्योग प्रशिक्षण दिले जाते.