सरकारकडून अणुप्रकल्प क्षेत्रात विशेष खबरदारी..!

| मुंबई | निसर्ग नावाच्या चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागासह गुजरातच्या किनारी भागाला बसण्याची शक्यता आहे. त्यानुसार आता या दोन्ही राज्यांतील सरकारांनी केंद्राच्या मदतीने कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, या चक्रीवादळाने तारापूर अणुउर्जा केंद्र आणि मुंबईसह इतरही काही बंदरावर सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.(nuclear plant)

नवभारत टाईम्स या आघाडीच्या दैनिकाने याबाबत बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, पालघर जिल्ह्यातील भारताच्या सर्वात जुन्या तारापूर या अणुभट्टीच्या भागातही निसर्ग हे चक्रीवादळ वेगाने येण्याची शक्यता आहे. BARC च्या या केंद्रामध्ये त्यामुळे विशेष काळजी घेतली जाणार आहे.

तसेच मुंबई पोर्ट, जवाहर लाल नेहरू पोर्ट आणि नेव्हीच्या काही ठिकाणांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबईत सध्या जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. यामुळे आतापर्यंत किमान २१ हजार लोकांना सुरक्षित स्थळावर हलवण्यात आलेले आहे. पालघर जिल्ह्यात रेस्क्यू ऑपरेशन चालू असतानाच गुजरातच्या नवसारी भागात लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू झालेले आहे.(nuclear plant)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *