एस टी नक्की कुणाला मोफत..? नव्या पत्राने संभ्रम वाढला..!| मुंबई | मोफत एसटी बसच्या निर्णयाबाबत सरकारचा गोंधळात गोंधळ असल्याचं चित्र दिसत आहे.  राज्यभरात एसटीचा मोफत प्रवास जाहीर केल्यानंतर काल मध्यरात्री सरकारचे आलेले नोटीफिकेशन आलं आहे. त्यानुसार मोफत सेवा ही राज्यातील अंतर्गत प्रवासासाठी नाही, अशा आशयाचं पत्रक मदत व पुनर्वसन विभागाकडून काढण्यात आलं आहे.  या पत्रकात महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेल्या इतर राज्यातील मजूरांना महाराष्ट्रातील त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहचवण्यासाठी आणि इतर राज्यात अडकलेले मजूर जे महाराष्ट्राच्या सीमेवर आले आहेत त्यांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यासाठीच मोफत एसटी प्रवास असेल असं सांगण्यात आलं आहे.

याशिवाय कोणत्याही इतर प्रवासासाठी राज्य परिवहन विभागाची बससेवा मोफत उपलब्ध असणार नाही, असं या पत्रकात म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन हे पत्रक ट्वीट केलं आहे.

हजारो लोकांना मुंबई, पुणे आणि त्या लगतच्या शहरांमधून गावी जायचे आहे. मात्र आता मदत व पुनर्वसन विभागाकडून आलेल्या नव्या निर्णयाने संभ्रम निर्माण झाला आहे. मोफत प्रवासाचा निर्णय परिवहन विभागाने घोषित केला आणि त्यानंतर हा खुलासा मदत आणि पुनर्वसन विभागाने दिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *