शिक्षकांसाठी राज्यस्तरीय ऑनलाईन गणित कार्यशाळा; नामवंत तज्ञांचा सहभाग..!

| जळगाव | कोविड १९ महामारीच्या प्रादुर्भावाने संबंध महाराष्ट्रात शाळा बंद आहेत. विद्यार्थी आरोग्य हित महत्वाचे असल्याने सरकारने विद्यार्थ्यांसह शाळा उघडायला अजिबात परवानगी दिलेली नाही. परंतु त्याच वेळी शिक्षकांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म द्वारे अध्ययन अध्यापन प्रक्रिया समृध्द करण्यासाठी वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे. सध्या ऑनलाईन शिक्षणाचा ट्रेंड सुरू असल्याने वेगवेगळ्या वेबिनार च्या माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे, चर्चा घडविल्या जात आहेत. शिक्षणातील हा पुढचा टप्पा असून अध्ययन अध्यापन प्रक्रिया समृध्द होण्यासाठी यातून चर्चात्मक कार्यशाळा संपन्न होत आहेत.

त्या धर्तीवर जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर सायंटिस्ट तसेच इंडिया रामानुजन कल्ब राजकोट यांच्या माध्यमातून शिक्षकांसाठी राज्यस्तरीय गणित ऑनलाईन मोफत कार्यशाळा उद्या ८ जुलै आणि ९ जुलै रोजी दुपारी ४ ते ५.३० या वेळेत संपन्न होणार आहे. सदर कार्यशाळेत देशातील तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.

खेळ व मनोरंजनातून सहज गणित कसे शिकवावे, समजून घ्यावं याबाबत प्रामुख्याने तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजक ग. स. सोसायटी, जळगावचे तज्ञ संचालक योगेश इंगळे तसेच जीवन महाजन, गोविंदा ठाकरे, अजित चौधरी व प्राजक्त झावरे पाटील असून त्यांनी या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे देखील सांगितले आहे. तसेच अधिकाधिक शिक्षकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.!

“राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी देशातील नामवंत गणित तज्ञांच्या मार्गदर्शनाची पर्वणी आहे, सर्वांनी याचा लाभ घ्यावा शैक्षणिक अध्ययन-अध्यापन प्रक्रिया एक उंच आणि वेगळ्या स्तरावर नेण्याचा हा प्रयत्न आहे.”

-योगेश इंगळे ,आयोजक -जळगाव

राज्यस्तरीय गणित ऑनलाईन कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी:

गुगल फॉर्म लिंक –
https://forms.gle/Jf6gHvtHqHXcRAvFA

टेलिग्राम ग्रुप लिंक –
https://t.me/joinchat/FBq9SReQwWH166znH3Fymg

फेसबुक पेज लिंक –
https://www.facebook.com/groups/1242613192738053/?ref=share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *