बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा असाही सामाजिक उपक्रम..!

प्रतिक्रिया..!
सदरचा उपक्रम आम्ही भव्य स्वरूपात प्रत्येक वर्षी राबवत असतो. आमच्या ज्येष्ठ नेत्यांना या उपक्रमातून आम्ही श्रद्धांजली च देत असतो. या वर्षी कोरोनाचे संकट असले तरी परंपरेत खंड न पडू देता आम्ही यंदा टाटा हॉस्पिटल मध्ये रक्तदान शिबिर घेतले.!
– श्री. अविनाश दौंड , सरचिटणीस ,बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना

| मुंबई | कोरोना महामारीच्या जगव्यापी संकटाने मानवापुढे अनेक समस्या उभ्या केल्या आहेत. लक्षावधी नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यांना प्राधान्याने आरोग्य सेवा पुरवताना इतर रुग्णांना पुरेशा सेवा उपलब्ध होत नाहीत.  तसेच राज्यातील बहुतेक रुग्णालयात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. 

विशेषतः टाटा कॅन्सर रुग्णालयात रक्ताची तातडीची गरज भासल्याने बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने काल दिनांक १२ रोजी टाटा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.  तसे बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना प्रतिवर्षी स्वर्गीय सुनिलजी जोशी आणि दादा मंडलिक यांच्या स्मरणार्थ माहे मे मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असते. परंतु, कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर वेगळे रक्तदान शिबीर आयोजित करणे शक्य नसल्याने काल हे शिबिर टाटा कॅन्सर रुग्णालयात घेण्यात आले. 

दरम्यान , कोरोना संसर्गाच्या भयंकर संकटाच्या पार्श्र्वभूमीवर एकुण ३२ कार्यकर्त्यांनी रक्तदान केले आहे. यावर्षी अनेक अडचणी असुनही शिबिराचे आयोजन करुन संघटनेने आपल्या नेत्यांना कृतिशील श्रद्धांजली अर्पण केली आहे. टाटा कॅन्सर रुग्णालयातील रक्तपेढी संचालकांनी देखील संघटनेचे आभार मानले असून, संघटना या कठीण काळात करत असलेल्या सामाजिक कार्यक्रमाची स्तुती देखील केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *