‘ सुसाइड या मर्डर : एक स्टार खो गया ‘ सुशांतच्या आत्महत्येवर चित्रपट..!

| मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट येऊ घातला आहे. ‘सुसाइड या मर्डर : एक स्टार खो गया’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. या चित्रपटात सुशांतची भूमिका टिकटॉक स्टार सचिन तिवारी साकारणार आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर टिकटॉक स्टार सचिन तिवारीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सचिन हुबेहुब सुशांतसारखाच दिसतो, असा दावा नेटकऱ्यांकडून करण्यात येत होता. त्यामुळे सुशांतच्या आयुष्यावर आधारीत असणाऱ्या या चित्रपटात सचिन तिवारी मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.

‘सुसाइड या मर्डर : एक स्टार खो गया’ या चित्रपटाची निर्मिती विजय गुप्ता करणार आहेत. तर अद्याप या चित्रपटाचं दिग्दर्शन कोण करणार, हे समोर आलेलं नाही. मीडिया रिपोर्टनुसार, सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरु असून सप्टेंबरपासून शुटिंग सुरु केलं जाऊ शकतं. मुंबई आणि पंजाबमधील काही ठिकाणी या चित्रपटातं शुटिंग केलं जाऊ शकतं, अशी प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे. तसेच याच वर्षी ख्रिसमसला हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ शकतो.

विजय गुप्ता निर्मित ‘सुसाइड या मर्डर : एक स्टार खो गया’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. प्रोडक्शन हाऊसच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सचिन तिवारी सुशांतच्या भूमिकेत दिसून येत आहे. या पोस्टरवर सचिनला इन्ट्रोड्यूस करताना त्याचा उल्लेख आऊटसायडर असा केला आहे. कारण सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये प्रचंड खळबळ माजली असून बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा ऐरणीवर आला होता. तसेच अनेकजण सुशांत इडस्ट्रीमध्ये आऊटसायडर होता. त्यामुळेच त्याला सतत सगळ्यांच्या टिकेचा सामना करावा लागत होता असा आरोप करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *