६१ नवीन राज्यसभा सदस्यांचा शपथविधी २२ जुलै रोजी..!

| नवी दिल्ली | येत्या २२ जुलै रोजी राज्यसभेत नवनिर्वाचिक राज्यसभा खासदारांच्या शपथविधी सोहळा होणार आहे. राज्यसभेच्या चेंबरमध्ये होणा-या या शपथविधी सोहळण्यासाठी ६१ सदस्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण लक्षात घेऊन, या कार्यक्रमादरम्यान योग्य ती खबरदारी घेण्यात येईल.

सूत्रांनी सांगितल्यानुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करता यावे, यासाठी पहिल्यांदाच शपथविधी सोहळा सभागृहाच्या चेंबरमध्ये इंटर-सेशन पीरियडदरम्यान पार पडेल. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत २० राज्यातील ६१ सदस्य राज्यसभेवर निवडून गेले होते.

या निवडणुकीत मध्यप्रदेशातून भाजपचे ज्योतिरादित्य शिंदे आणि काँग्रेसचे दिग्विजय सिंह विजयी झाले. हे दोन्ही नेते, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. तसेच, काँग्रेसचे संघटना महासचिव केसी वेणुगोपाल राजस्थानमधून विजयी झाले होते. राज्यसभेच्या १९ जागांसाठी १९ जूनला झालेल्या निवडणूकीत भाजपला ८ आणि काँग्रेसला ४ जागांवर विजय मिळाला होता. मागच्या वेळेस या १९ जागांपेकी भाजपला ९ आणि काँग्रेसला ६ जागा मिळाल्या होत्या. म्हणजे, यावेळी भाजपला १ आणि काँग्रेसला २ जागांवर पराभवाचा सामना करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *