काल कोरोना रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ..


  • दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : २० एप्रिल, सोमवार

मुंबई : राज्यात काल दिवसभरातील सर्वाधिक ५५२ कोरोना बाधितांची नोंद झाली. यात सर्वाधिक मुंबईत १३२ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. त्याखालोखाल पुण्यात ४९ जणांना कोरोनाची लागण झाली. परिणामी राज्यातील आकडा ४२०० झाला आहे. कालपर्यंत ५०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, दिवसभरात १२ कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला. यातील सहा मृत्यू हे मुंबईत, चार मालेगाव आणि प्रत्येकी एक सोलापूर मनपा आणि अहमदनगर येथील जामखेडमधील आहे. काल रुग्णांची संख्या वाढल्याने राज्यासाठी काळजीचं कारण झालं आहे. विशेषतः मुंबई, पुण्यातील वाढते रुग्ण सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे.

आतापर्यंत एकूण..

मुंबई महानगरपालिका – २७२४ (मृत्यू १३२)
ठाणे – २० (मृत्यू २)
ठाणे महानगरपालिका- ११० (मृत्यू २)
नवी मुंबई मनपा – ७२ (मृत्यू ३)
कल्याण डोंबिवली – ६९ (मृत्यू २)
उल्हासनगर – १
भिवंडी, निजामपूर – ५
मिरा-भाईंदर – ७१ (मृत्यू २)
पालघर – १७ (मृत्यू १ )
वसई- विरार – ८५ (मृत्यू ३)
रायगड – १३
पनवेल – २७ (मृत्यू १)
नाशिक – ४
नाशिक मनपा – ५
मालेगाव मनपा – ७८ (मृत्यू ६)
अहमदनगर – २१ (मृत्यू १)
अहमदनगर मनपा – ८
धुळे -१ (मृत्यू १)
जळगाव – १
जळगाव मनपा – २ (मृत्यू १)
पुणे – १७ (मृत्यू १)
पुणे मनपा – ५४६ (मृत्यू ४९)
पिंपरी-चिंचवड मनपा – ४८ (मृत्यू १)
सातारा – ११ (मृत्यू २)
सोलापूर मनपा – १५ (मृत्यू २)
कोल्हापूर – ३
कोल्हापूर मनपा – ३
सांगली – २६
सिंधुदुर्ग – १
रत्नागिरी – ६ (मृत्यू १)
औरंगाबाद मनपा – ३० (मृत्यू ३)
जालना – १
हिंगोली – १
परभणी मनपा – १
लातूर – ८
उस्मानाबाद – ३
बीड – १
अकोला – ७ (मृत्यू १)
अकोला मनपा – ९
अमरावती मनपा – ६ (मृत्यू १)
यवतमाळ – १४
बुलढाणा – २१ (मृत्यू १)
वाशिम – १
नागपूर – २
नागपूर मनपा – ६७ (मृत्यू १)
चंद्रपूर मनपा – २
गोंदिया – १


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *