| मुंबई | अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा चालू करण्याचा महत्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुंबई, ठाण्यात कामाला जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील चाकरमानी यांना ही सेवा सुरू करावी यासाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना देखील पाठ पुरावा करत होती. त्यामुळे या संघटनेचे मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
कर्मचारी यांना कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी मुख्य प्रश्न होता तो कार्यालयात येण्याजाण्याचा. मुंबईतील राज्य शासकीय कर्मचारी हे पुणे, नाशिक, कर्जत, कसारा, पनवेल, विरार, पालघर येथुन नेहमी रेल्वे व सार्वजनिक वाहनांतून ये-जा करतात. त्यामुळे त्यांना आता रस्ते प्रवासात कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता खूपच वाढणार होती. त्यात कार्यालयात येणाऱ्या एखादया व्यक्तीस कोरोना झाल्याचे लक्षात आल्यास ते संपूर्ण कार्यालय/विभाग Quarantine कराव लागेल. त्यामुळे संपूर्ण कार्यालय/विभाग ठप्प होण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती. त्यामुळे संघटनेने केलेल्या मागणी मधील महत्वाची लोकलसेवा चालू करण्याची मागणी आता मान्य झाली आहे.आपल्या सर्वंकष प्रयत्नांनी बेस्ट आणि एस. टी. चे कर्मचारी जीवाची पर्वा न करता सेवा बजावत आहेत. परंतु या सेवांना साधन सामुग्रीच्या मर्यादा आहेत. त्यातच सोशल डिस्टंन्सींग पाळावयाचे असल्याने बसेसचा वापर पूर्ण क्षमतेने करता येत नाही ही वस्तुस्थिती होती. परिणामी कल्याण, डोंबिवली, बदलापूर, विरार, वसई, पनवेल येथुन मुंबईतील कार्यालयात येणे अशक्यप्राय होते होते. केवळ बस थांब्यावर दोन ते तीन तास बसची प्रतिक्षा करावी लागत होती, यातून कर्मचारी यांची सुटका सरकारने केल्याने, सरकारचे आम्ही आभार मानतो, असे संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी सांगितले आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .