सध्याचे मुख्यमंत्री दिलदार, तर सत्ता नसलेले फडणवीसांना सहन होईना – यशोमती ठाकूर

| नागपूर | भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. यावर आता महाराष्ट्रातील नेतेमंडळीही आपली प्रतिक्रिया देत आहेत. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. भाजपला घोडेबाजाराची सवय आहे, त्यांना पैशाचा उन्मात आहे, अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी भाजपवर टीका केली आहे.

कर्नाटकात असताना मी हे सर्व अनुभवले होते. हे सर्व राजकीय संस्कृतीच्या विरोधात आहे. मात्र, महाराष्ट्रात राजस्थानसारखी परिस्थिती उद्भवणार नाही, असा आशावाद यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

”देवेंद्र फडणवीस आमच्या विदर्भातील आहेत. मात्र, त्यांना सत्ता नसलेलं सहन होत नाही”, अशी टीकाही यशोमती ठाकूर यांनी फडणवीसांवर केली. तसेच, राज्यात दिलदार मुख्यमंत्री आणि शरद पवार, सोनिया गांधी असल्याने राज्यातील सरकार स्थिर असल्याचंही त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *