१८ मे रोजी शपथविधी ..! उध्दव ठाकरे घेणार शपथ..!

| मुंबई |  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी १८ मे रोजी दुपारी १ वाजता विधान परिषद सभापतींच्या उपस्थितीत विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत.  विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व ९ उमेदवारांचा शपथविधी सोमवारी विधान परिषदेत सभापतींच्या उपस्थित पार पडणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या कालवधीच्या आत ते आमदार म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या सोबतच महाविकास आघाडी आणि भाजपचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवारही शपथ घेणार आहेत.

दरम्यान, उध्दव ठाकरे यांचे आमदार होण्याच्या मार्गात अनेक अडथळे येत गेले. परंतु सगळ्यांना मागे टाकत आणि आपली मुत्सद्देगिरी दाखवत त्यांनी आपली वाटचाल दणक्यात चालू ठेवली आहे. कठीण परिस्थितीत आपले आश्वासक वागणे सरकारला आणि पर्यायाने महाराष्ट्राला आपलेसे वाटू लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *