जगातील सर्वात मोठी प्लाज्मा थेरपी ट्रायल महाराष्ट्रात…!

| मुंबई | कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाज्मा थेरपीचा वापर राज्यात होत असून, त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. या थेरपीचा वापर व्यापक प्रमाणात होण्यासाठी महाराष्ट्रात जगातली सर्वात मोठी प्लाज्मा थेरपी ट्रायल केली जात आहे. त्यामुळे आता कोरोनाला हरवून बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाज्मा दान करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

राज्यातील २३ वैद्यकीय महाविद्यालयात प्लाज्मा थेरपी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात प्लॅटिना प्रोजेक्ट प्लाज्मा थेरपी ट्रायल केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी प्लाज्मा डोनेशन, प्लाज्मा बँक, प्लाज्मा ट्रायल आणि ईर्मजन्सी आॅथराजेशन या चार सुविधांचेही उद्घाटन करण्यात आले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या सोहळ्यास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमीत देशमुख तसेच संबंधीत जिल्ह्यांचे पालकमंत्री आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *