सूर्याचा कहर, अकोल्यात सर्वाधिक ४७.४ अंश सेल्सिअस तापमानची नोंद..!

| नागपूर | एका बाजूला कोरोनाचा कहर आणि दुसरीकडे उन्हाचा तडाखा यामुळे विदर्भातील लोकं हैराण झाले आहेत. विदर्भात तापमानात कमालीची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातील शहरांचे तापमान वाढत चालले आहे. पुढील आठवड्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडता येत नाहीये. त्यामुळे एवढा गर्मीचा त्रास होऊन देखील नागरिकांना बाहेर पडता येत नाहीये. त्यात आता वाढत जाणारं तापमान यामुळे लोकं आणखी वैतागले आहेत.

नागपूरमध्ये ४७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अकोला येथे विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यात आज ४७.४ एवढ्या जास्त तापमानाची नोंद झाली आहे.

ही आहे इतर जिल्ह्यांची आकडेवारी
नागपूर – ४७
अकोला – ४७.४
अमरावती – ४६
चंद्रपूर – ४६.८
गोंदिया – ४५.८
वर्धा – ४६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *