…तर भाजपचे आमदार करणार होते क्रॉस वोटिंग..!

| जळगाव | पंतप्रधान मोदींना शिव्या घालणाऱ्या गोपीचंद पडवळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली, अशी जाहीर खंत व्यक्त करणाऱ्या  एकनाथ खडसे यांनी याच विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मला सहाव्या जागेसाठी ऑफर आली होती आणि भाजपचे ६ ते ७ आमदार मला स्वत: क्रॉस वोटिंग करणार होते. त्यांनी स्वत: माझ्याकडे असे मान्य केले होते, असा गौप्यस्फोट केला. 

विधान परिषद निवडणुकीसाठी आश्वासन देऊनही दगाफटका झाला, त्याचे वाईट वाटत नाही. परंतु निष्ठावंतांना डावलले याची खंत आहे. भाजपने तिकीट कापल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांचा दबाव वाढत आहे.  निर्णय तर घ्यावा लागेल परंतु कोरोना संकटसमयी राजकारण करणे ठीक नाही. त्यामुळे मी ऑफर मान्य केली नाही,  असेही ते म्हणाले.

दरम्यान गोपीचंद पडळकर आणि मोहिते पाटील हे आयात उमेदवार असल्याने भाजपच्या अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. पंकजा ताई आणि एकनाथ खडसे यांनी याला तोंड फोडले आहे. 

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *