| पंढरपूर | आज पहाटे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक पंढरपुरात पोहोचले. विठ्ठलाची महापूजा करण्यासाठी त्यांच्यासह पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे मंदिराच्या गाभ्यात महापूजेसाठी बसले होते. अचानक आदित्य हे पूजेतून उठून गेले. त्यामुळे त्यांचे सुरक्षारक्षकदेखील चक्रावले. नेमके काय झाले ते कुणालाच कळले नाही.
थोड्या वेळाने कळले की, त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांना पिण्यासाठी पाणी देण्यात आले. त्यानंतर अर्धातास गाडीत बसल्यावर त्यांना थोडं बरं वाटू लागलं. बरं वाटू लागल्यानंतर आदित्य पुन्हा मंदिराच्या गाभाऱ्यात गेले.
विठ्ठल-रुक्मिनीचं दर्शन घेऊन मंदिर देवस्थानच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा सत्कार सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचले. त्या कार्यक्रमात सहभागी झाले. आता त्यांची प्रकृती चांगली ठणठणीत असल्याची माहिती मिळाली आहे.
- महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा
- लोकसभा निवडणुकीत मतदानात होतेय हेराफेरी ? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य