| नवी दिल्ली | कोरोना विषाणू आणि देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित केलं. लॉकडाऊन ३ चा कालावधी आता काही दिवसांनी म्हणजेच १७ मे रोजी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधानांनी देशातील जनतेला संबोधित करत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. पंतप्रधान मोदींनी यावेळी ‘लॉकडाऊन ४ ची घोषणाही केली. तसेच, ‘स्वावलंबी भारत’ संकल्पाचा नारा देशाला दिला.
कोणत्या पाच स्तंभावर उभा असेल स्वावलंबी भारत :
- स्वावलंबनाचा पहिला स्तंभ अर्थव्यवस्था
- स्वावलंबनाचा दुसरा स्तंभ पायाभूत सुविधा
- स्वावलंबनाचा तिसरा स्तंभ तंत्रज्ञानाधारीत व्यवस्था
- स्वावलंबनाचा चौथा स्तंभ आपली लोकशाही
- स्वावलंबनाचा पाचवा स्तंभ मागणी-पुरवठ्याचे चक्र
“स्वावलंबी भारताची भव्य इमारत ही पाच स्तंभांवर उभी आहे. पहिला स्तंभ हा अर्थव्यवस्था आहे. दुसरा स्तंभ हा पायभूत सुविधा आहे. तिसरा स्तंभ आपली तंत्रज्ञानाधारीत व्यवस्था आहे, जी २१ व्या शतकाच्या स्वप्नांना साकार करणारी आहे. चौथा स्तंभ म्हणजे लोकशाही. लोकशाही आपली ताकद आहे. स्वावलंबी भारतासाठी लोकशाही ऊर्जाचा स्त्रोत आहे. पाचवा स्तंभ पुरवठ्याचे चक्र आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत मागणी आणि पुरवठ्याची जी साखळी आहे, त्याचा पूर्ण क्षमतेनुसार वापर करण्याची जास्त आवश्यकता आहे. मागणी वाढवण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी प्रत्येक गोष्टींचं सशक्त असणं गरजेचं आहे. आपली पुरवठा करणारी साखळी व्यवस्थेला मजबूत करणार. यामध्ये भारताच्या मातीचा आणि भारतीय मजुरांच्या घामाचा सुगंध असणार आहे”, असं म्हणत मोदींना देशातील जनतेला ‘स्वावलंबी भारत’चा नारा दिला.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .