मोदींनी सांगितलेले स्वावलंबी भारताचे हे आहेत ‘ पाच ‘ खांब..!

| नवी दिल्ली | कोरोना विषाणू आणि देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित केलं. लॉकडाऊन ३ चा कालावधी आता काही दिवसांनी म्हणजेच १७ मे रोजी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधानांनी देशातील जनतेला संबोधित करत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. पंतप्रधान मोदींनी यावेळी ‘लॉकडाऊन ४ ची घोषणाही केली.  तसेच, ‘स्वावलंबी भारत’ संकल्पाचा नारा देशाला दिला. 

कोणत्या पाच स्तंभावर उभा असेल स्वावलंबी भारत :

  • स्वावलंबनाचा पहिला स्तंभ अर्थव्यवस्था
  • स्वावलंबनाचा दुसरा स्तंभ पायाभूत सुविधा
  • स्वावलंबनाचा तिसरा स्तंभ तंत्रज्ञानाधारीत व्यवस्था
  • स्वावलंबनाचा चौथा स्तंभ आपली लोकशाही
  • स्वावलंबनाचा पाचवा स्तंभ मागणी-पुरवठ्याचे चक्र

“स्वावलंबी भारताची भव्य इमारत ही पाच स्तंभांवर उभी आहे. पहिला स्तंभ हा अर्थव्यवस्था आहे. दुसरा स्तंभ हा पायभूत सुविधा आहे. तिसरा स्तंभ आपली तंत्रज्ञानाधारीत व्यवस्था आहे, जी २१ व्या शतकाच्या स्वप्नांना साकार करणारी आहे. चौथा स्तंभ म्हणजे लोकशाही. लोकशाही आपली ताकद आहे. स्वावलंबी भारतासाठी लोकशाही ऊर्जाचा स्त्रोत आहे. पाचवा स्तंभ पुरवठ्याचे चक्र आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत मागणी आणि पुरवठ्याची जी साखळी आहे, त्याचा पूर्ण क्षमतेनुसार वापर करण्याची जास्त आवश्यकता आहे. मागणी वाढवण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी प्रत्येक गोष्टींचं सशक्त असणं गरजेचं आहे. आपली पुरवठा करणारी साखळी व्यवस्थेला मजबूत करणार. यामध्ये  भारताच्या मातीचा आणि भारतीय मजुरांच्या घामाचा सुगंध असणार आहे”, असं म्हणत मोदींना देशातील जनतेला ‘स्वावलंबी भारत’चा नारा दिला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *