या अभिनेत्याने देखील केली मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची स्तुती..!| मुंबई |  देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची सख्या वाढत असल्याचे दिसत आहे. करोनाचा संसर्ग कमी व्हावा यासाठी देशपातळीवर तसंच राज्यपातळीवर देखील विशेष प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी काही निर्णय घेतले. काही उपाय योजना राबवल्या त्या कामाबद्दल त्यांचं सर्वांकडून कौतुक होत आहे. या पूर्वी त्यांच्यावर टीका करणारे अनेक जण उद्धव ठाकरे यांच्याबद्दल गौरोद्गार काढत आहेत. अभिनेता रितेश देशमुख यानं देखील उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.

ट्विट करून रिेतेशनं उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे. ‘ आपण सगळे सध्या विचित्र आणि कधीही विचार न केलेल्या संकटाला सामोरं जात आहोत. या करोना व्हायरस व्यतिरीक्त आपण भीती, चिंता आणि अनिश्चिततेविरुद्ध देखील लढत आहोत. यादरम्यान आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रोज राज्यातील नागरिकांसोबत संवाद साधत आहेत. त्यांना धीर देत आहेत. राज्यातील परिस्थिती समजावून सांगत आहेत. यासाठी त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे’, असं रितेशनं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रामाणिकपणाने चाललेल्या कामाची सगळ्यांनाच भुरळ पडत आहे. 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *