| नवी दिल्ली | भारतीयांना आनंद व्हावा, असे वृत्त कोरोनाच्या या महासंकटात समोर येत आहे. ‘आयुर्वेद’ या प्राचीन भारतीय उपचारपद्धतीत ज्या वनस्पतीचे महत्व सांगण्यात आले आहे, त्या अश्वगंधा वनस्पतीचा कोरोना विषाणूच्या विरोधात प्रभावी रितीने उपयोग करता येतो, असे दिल्ली आयआयटी आणि जपानची आयएएसटी या संस्थांनी संयुक्तरित्या केलेल्या संशोधनात दिसून आले आहे.
अश्वगंधा आणि प्रोपोलिस या वनस्पतींची नैसर्गिक संयुगे कोरोना रोखण्यासाठी प्रभावी ठरली आहेत. या दोन संस्थांच्या संशोधकांनी अश्वगंधा वनस्पतीपासून बनविलेल्या संयुगांचा प्रयोग ‘सार्स कोव्हिड-2’ या विषाणूदव्यावर केला. या विषाणूद्रव्याला कोरोनामूलद्रव्य (एमपीआरओ) म्हणून ओळखले जाते. हा प्रयोग समाधानकारकरित्या यशस्वी झाला आहे. याच विषाणूद्रव्यापासून सध्याचा कोरोना, अर्थात कोव्हिड-19 हा विषाणू उत्क्रांत झाला आहे. त्यामुळे अश्वगंधा सध्याच्या कोरोनाविरोधातही चांगली कामगिरी करू शकेल असा विश्वास संशोधक डी. सुंदर यांनी व्यक्त केला. अर्थात हे संशोधन प्राथमिक अवस्थेत आहे.या महत्वाच्या संशोधनामुळे कोरोनाविरोधातील औषधे शोधण्याची गती वाढणार आहे. कोरोनाचे विषाणू नष्ट करण्यात अश्वगंधा वनस्पती भविष्यात महत्वाची भूमिका घेऊ शकेल एवढा आत्मविश्वास या संशोधनातून निर्माण झाला आहे.
अश्वगंधा वनस्पती भारतात कोठेही सहजगत्या उपलब्ध होऊ शकते. या वनस्पतीपासून निर्माण केलेल्या संयुगांची सायक्लोडेक्स्ट्रिन्स संयुगांशी युती केल्यास प्रभावी औषध निर्माण होऊ शकते. हे औषध कोरोना होऊच नये यासाठी आणि झालास बरा करण्यासाठी अशा दोन्ही दृष्टींनी उपयोगात आणले जाऊ शकेल असा संशोधकांचा कयास आहे. अश्वगंधा वनस्पतीवर आयुष मंत्रालयाकडूनही अभ्यास सुरू आहे. हे औषध उपलब्ध होण्यास काहीसा वेळ लागू शकतो. पण आशेचा एक किरण दिसू लागला आहे, हे निश्चित, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा