| औरंगाबाद | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी आज तडकाफडकी राजकीय संन्यास घेत असल्याची घोषणा केली. त्यांच्या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी एका व्हीडिओ संदेशाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली. या व्हीडिओत हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून मी माझ्या अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासत आहे. त्यावेळी मला आपण अनेक गोष्टींसाठी विनाकारण पळापळ करत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी व्हीडिओत म्हटले आहे.
मात्र, यावेळी त्यांनी आपली पत्नी संजना जाधव ही आपली राजकीय उत्तराधिकारी असेल, हे स्पष्ट केले. त्यामुळे आता लोकांनी आपल्या अडचणी त्यांच्याकडून सोडवून घ्याव्यात, असे आवाहनही हर्षवर्धन जाधव यांनी केले. हर्षवर्धन जाधव २००९ साली औरंगाबादच्या कन्नड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र, यानंतर राज ठाकरे यांच्यावर नाराज होऊन जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
२०१४ मध्ये ते शिवसेनेच्या तिकीटावर विधानसभेवर निवडून गेले. मात्र, शिवसेनेतील नेत्यांशी खटके उडाल्यामुळे त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. यानंतर गेल्याचवर्षी पार पडलेल्या मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनावेळी त्यांनी घरवापसी केली होती. मात्र, त्यांच्यावर कोणतीही विशेष जबाबदारी न देण्यात आल्याने ते पक्षात विशेष सक्रिय नव्हते. मनसे , सेना , अपक्ष, मनसे असे एक पूर्ण वर्तुळ त्यांनी पूर्ण केले होते.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री